पान:विधवा दुःख निवेदन.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. [६३ ] तरुण विधवा भगिनींना दोन शब्द. माझ्या भगिनींनो, वरील उदाहरणाने आमच्यांतील विधवांची सांप्रतची दुःखमय स्थिति मी सर्वांपुढे ठेविली आहे. आमच्या फुटक्या नशीबानं अगर पूर्वजन्मींच्या पापाचे योगाने आह्मांवर हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांत आमच्या ब्राह्मण समाजांतील जुन्या घातक रूढींची भर पडून तर कडेलोटच झाला आहे. हल्ली देश सुधारणेच्या मोठमोठ्या उलाढाली आमचे देशबंधू करीत आहेत. स्त्रियांना शिक्षण द्यावे, त्यांना कमी न मानतां पुरुषां इतके हक्क द्यावे, स्त्री हा आपल्या संसाराचा जन्माचा सोबती आहे त्यास प्रेमाने व आपल्या बरोबरीने वागविलें ह्मणजे त्यांत उभयतांचे कल्याण आहे, हुंडा व दागिने ह्या दोन गोष्टींनी उभयपक्षांतील ऐक्याचा भंग होतो ह्मणून हुंड्यासाठी मुलीच्या बापास नडवू नये, बाल विवाह बंद करावा, केवळ पैशा। रितां आपल्या पोटचे गोळे माताऱ्या कोताऱ्याच्या गळ्यांत बांधून त्यांच्या जन्माचे मातरें करूं नये, अशा अनेक रीतीनी आमचे देशबंधु ओरड करितात व समाजसुधारणा करण्याचा आव घालितात. पण तोच मनुष्य आपल्या घरच्या बायकांशी तसें वर्तन ठेवतो काय ? आमच्यासारखी विधवा बहीण घरी आली तर तिच्या दुःखाचें शांतवन करून तिचा कष्टमय मार्ग सुगम करून देण्याचा तो प्रयत्न करतो काय ? जुन्या घातक चाली मोडून