पान:विधवा दुःख निवेदन.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[१२] म्हणून उगाच हा लेख लिहिण्याला आरंभ केला. आणि बहुतेक लिहून झाल्यावर भावांजवळ गोष्ट काढिली. कारण त्यांचे मत्ताखेरीज माझा हेतु शेवटाला जाणार कसा ? म्हणून माझा सवे हेतु सांगून छापण्याचे काम तुम्हांवर अवलंबून आहे असे म्हणतांच त्यांनी मोठ्या खुषीनं हो. लिहून झालं म्हणजे आमच्याकडे दे आमी सर्व व्यवस्था करितों असं सांगितलं. पहा तरी ह्या त्यांचे उमेदी बोलण्याने मला फार आनंद झाला नी मी चालविलेले काम शेवटाला नेले. माझ्या प्रियकर बंधूंनी जी मला मदत केली तीबद्दल त्यांची उतराई होण्याला मजकडे काही साधन नाही. म्हणून जरा वाईट वाटलं, पण त्यांचे बोलण्याने मला समाधान झाले व मला शंभर रुपये आवाळणी घातल्यापेक्षा अधिक आनंद झाला आणि मनांत आले की ह्याच प्रमाणे आपले विद्वान देशबंधु जर माझ्या अल्प बुद्धीने लिहिलेल्या लेखाला यश देऊन मदतरूप ओवाळणी घालतील तर मलाच काय पण माझ्या अनाथ भगिनीना जन्माची ओवाळणी घातलेले श्रेय येणार आहे. म्हणून माझ्या अशुद्ध लिहिण्याची अवज्ञा न करितां व माझ्या अनधिकारी बोलण्याचा राग मनांत न धरितां आपला भाऊ समर्थ असला म्हणजे ममतेने लहान बहीण हट्ट धरून काही तरी बोलते, व आपली मागणी मागून घेते तसे बहिणीप्रमाणे मजवर प्रेम ठेऊन इष्ट हेतू पूर्ण कराल व वेड्यावांकड्या बोलण्याची मला क्षमा कराल अशी आशा आहे.