पान:विधवा दुःख निवेदन.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ६१] आली तर उलट तिरस्कार करितात. ह्मणून वाचकहो, विनंती करून मागते की तिला पुढे येण्याची व तुह्मी तिरस्कार करण्याची वेळ न यावी अशी तजवीज कराल अशी आशा आहे. - माझे मनांत हे विचार फार दिवस येत होते पण कोणचे निमित्ताने हे विचार उघडकीस आणावे ह्मणून मनांत घोळत होते. ह्याला काही तरी आधार पाहिजे ऐकण्यांत पुष्कळ ऐकल्या पण प्रत्यक्ष पाहिल्याखेरीज मला सर्व खोट्या वाटत; कारण ह्मण आहे की, एका हाताने टाळी वाजत नाही. पण टाळी वाजविण्याची वेळ आली म्हणजे हात देणं भाग पडतं. हा अनुभव प्रत्येकांना आहे म्हणून अधिक लिहिण्याची जरूर नाही. असो. हा अनुभव पाहून मला जो अभाव होता तो जाऊन मनाला वाटलं की माझा हेतु सिद्धीला जाण्याची वेळ आली, नि मला उमरावतीस जाण्याची बुद्धि झाली, व सर्व प्रकार पाहून माझ्या मनानं अगदी हाव घेतली. मला कांहीं सुचेना व मनांत आले की हा अज्ञातवास जर मी प्रसिद्ध केला तर आपले देशबंधू काही तरी तजवीन करितील. कारण देश सुधारणेसाठी जे रात्रंदिवस झटत आहेत ते आपले घरची कामे करण्याला क्षणभर विलंब लावणार नाहीत. व निर्धनतेची अनास्था व मनांतील इष्ट हेतु प्रसिद्ध केल्याखेरीज आपल्या देशबंधूंना समजणार नाही; व समजल्या खेरीज दया येणार नाही