पान:विधवा दुःख निवेदन.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

समाळणार कोण? कोणाचे तरी आधाराने बाहेर जा तर नानात-हेचे लोक अपवाद ठेवणार, यासाठी घरांतच कायतें होउंदे. ह्मणून स्वस्थ बसतात व न कांचा वार शनिवार त्या प्रमाणे कोणी ह्मणतात की बायकांजवळ पैसा असला ह्मणजे कोणाला त्या जुमानीत नाहीत. ह्मणून परतंत्रांत ठेउन वाक्शब्दांनी घायाळ केल्यामुळे एकमेकांत असलेला आनंद जाऊन ते मनुष्य नजरेपुढे नकोसें होतें. ह्मणून मी ह्मणते की अर्ध भाकरीवर तिची सत्ता ठेऊन कुटुंबांत असलेला आनंद कायम राखा; कारण मुलगा वेडा होईल ह्मणून आपली इस्टेट कोणी शेजाऱ्याचे स्वाधीन केली आहे का? नाही. तो कसाही होवो! बापाचे कर्तव्य त्यानं केलेच पाहिजे. त्या प्रमाणे हेही तुमचे कर्तव्य आहे. परतंत्रतेने अन्याय व जुलूम होण्याचा संभव आहे; ह्मणून ही नड ज्या दिवशी मागें होईल त्या दिवशी खरी सुधारणा झाली असे आह्मी ह्मणूं. विद्यालये घालून स्त्रियांना शिक्षण दिले हे उत्तम. व त्या सुधारणेमुळेच आमालाही हे ज्ञान झाले व हे विचार मनात येऊ लागले, की मौल्यवान हिरा कोंदणांत बसविला ह्मणने वाईट सोन्याची किंमत हिच्याबरोबर चढते व तोच हिरा मोकळा केला ह्मणजे त्या सोन्याला कोणीही विचारीत नाहीत. तशी पती नस्तां बायकोची स्थिती. काकुळबाणीने कोणी ये मणत नाही इतकेच नव्हे तर ती .