पान:विधवा दुःख निवेदन.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ५९ ] तुमचे ध्यानांत कशी येणार ? याकरितां मी सांगते की कुटुंबांतील अनाथ बायांवर प्रेम काय ? तर घरांतून बाहेर जाऊ नये. गुप्त त्रास सोसून घरांत रहावं; ह्मणजे काय ? मागे एक वेळ मी सांगितले आहे की आई जेऊं घालीना नी बाप भीक मागू देईना. तशी आमची स्थिती असता आमचे हातून चांगली व नावाजण्यासारखी कामें कोणती होणार ? कारण निर्धनता व पराधीनता ह्या दोन्ही मध्ये अडकलेला निराश्रित मनुष्य काय करणार ? आतां कुणाचे मनात आले असेल की आपल्या देशांत प्रसूती प्रसंग वरचेवर येतात व ते प्रसंग निवारणाऱ्या बायका फारच थोड्या. शिवाय, अनेक बायकांची दुखणी आहेत त्यांचे निवारणार्थ डाक्टराजवळ वाचालता करणे म्हणजे किती कठीण पडते. म्हणून ज्या बायकांवर संसाराचा बोजा नाही व मागे कसली काळजी नाही म्हणून त्यांचे हातून ही कामें फार निर्वेधपणाने होतील. प्रशस्तपणाने दुखणे निवेदन केल्यामुळे अनेक रोग मागें तात्काळ हटतील. व सहज गरीब लोकांचेही कल्याण होण्यासारखे आहे. कारण डाक्टरांना गरीब लोक फार भितात. ह्याविषयी माझे मनांत वारंवार येते पण मनांत येऊन करतां काय ? जवळ पैसा नाही, आणि हा बोजा व ही भीड कुणाला घालावी ? व घालून तरी देणार कोण ? काबाडकष्ट करूनही सुखार्ने अन्न घालून चिरगुट वस्त्र देणे त्यांना फार जड पडते व तेवढ्यासाठी वशिले लावण्याची वेळ येते. मग हा खर्च