पान:विधवा दुःख निवेदन.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ५८ ] उनाड लोक बोलतात थोडे पैसे देऊन नायकिणी सुमार आणल्या; जेवणार ह्मणतात पक्काने बिवडली, आचारी ह्मणतात पैसा रगड दिला नाही. झालं तुमचे चांगुलपणाचा निकाल लागला, ह्मणून ह्मणते की, आलेला हुंडा परस्पर अडकला ह्मणजे तुह्मीं सत्रा लचांडांतून मोकळे होऊन उभय पक्षांचे कल्याण होईल. आता अशी एक कल्पना निघते की, सर्वांनाच हुंडा कुठे येतो? व न आल्याची व्यवस्था कशी करावी ? तर सर्वाविषयी माझं बोलणे नाही. कारण जे प्रतिदिवशी भिक्षेचे तांदूळ व दक्षिणेचे पैसे जमवून निर्वाह करितात. त्यांनाही उद्योग आहे त्यांविषयी माझा वाद निराळा आहे. माझे मत इतकेंच आहे की, आपली ऐपत नसतांही मुलीचे आमरणात कल्याण असावे आणि अनास्था न व्हावी म्हणून ऐपत नसतांही सावकाराचे घरी हेलपाटे घालून मोठ्याच्या व नामांकिताच्या घरी आपल्या मुली देतात. आणि यांचे मुलविर जर उदाहरण दिलेल्या मुलीप्रमाणे प्रसंग आले तर खर्च करणाराचे मनांत किती दुःख होईल व परिणाम कसा होतो तोही मागें दिलाच आहे. म्हणून हा विचार करणारे वडील मंडळीवर अवंलबून आहे. इतकें बोलून मी भावांना म्हटले की तुम्ही देशोन्नतीसाठी रात्रंदिवस झटतां व पुढारी म्हणून घेतो. परंतु दिव्याखाली अंधार त्याप्रमाणे तुमची स्थिती आहे. सहज होण्यासारखे काम असतां तुमचे हातून होत नाही. मग गरिबाची तोड