पान:विधवा दुःख निवेदन.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ५७ ] अनुकूल दिवस आले तर तो पैसा तुमच्या मुलाचेच संसाराला लागणार आहे. व भिकूप्रमाणे जर कदाचित् प्रसंग आलातर परस्पर तिघांची बेगमी झाली. यांत तुमचा तोटा तो काय ? झालं आतां माझ्या ह्या बोलण्याचा आमचे प्रिय बंधू अथवा भगिनींना राग येईल की लग्नाचे वेळी वाईट मनांत आणणे ह्मणने अशुभ आहे. पण आपण लग्नाला निघालों ह्मणजे वाटेंत अडचण पडेल ह्मणून सर्व सामग्री घेतों इतकेच नव्हे तर औषधे सुद्धा घेतों ह्मणून कोणी आजारी पडावा आणि आणलेल्या औषधांचा उपयोग व्हावा अशी इच्छा नसते. औषध नसले तरी हरकत नाही पण प्रसंगी उपयोगी पडेल ह्मणन वाईट मनांत आणून सामग्री पाहिजे त्याचप्रमाणं ही गोष्ट आहे तर ज्याला ह्मणून आपले कुटुंब सुखाने राहण्याची इच्छा आहे त्यांनी विवाहाच्या आधी हे विचार मनांत आणले पाहिजेत. बरे हुंडा तरी तुमचे तिजोरीला कुठं पोचतो? तो ही नाही. कारण हुंडा घेणान्यामागे अनेक लचांडं आहेत; कोणी ह्मणतो हुंड्याप्रमाणं दागिने घातले . नाहीत. कोण ह्मणतो त्या प्रमाणे खर्च नाही. पण खर्च ह्मणजे काय ? तर, दारू, नाच आणि मेजवान्या. अगांतुकाला जेवण मिळत नाही. व दरिद्याला मूठभर भीक मिळत नाही. मात्र हजार हुंडा तर दोन हजार खर्च. बरं इतके करून तरी लोकांचे समाधान होते का ? तेही नाही. कारण ब्राह्मण ह्मणतात योग्यतेप्रमाणे दक्षिणा दिली नाही. चैनी व