पान:विधवा दुःख निवेदन.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ५६ ] स्वजातीचे मुली बहिणीच्या हितासाठी जर झटलां तर तुमचे विद्वत्तेला भर पडून तुमचे कुटुंबांतील अनाथ झालेल्या कन्या भगीनींना दीनत्व प्राप्त होणार नाहीं; व तुम्ही मनावर घेतले तर क्षणभरसुद्धा लागणार नाही म्हणून म्हणते की, आपल्या देशांत म्हणा अथवा आपल्या ब्राम्हण लोकांत म्हणा, हुंडा घेण्याची जी चाल पडली आहे ती किती चमत्कारिक आहे. हुंडा घेणे झणजे आपली देणगी वसूल केल्याप्रमाणे लोक करितात. पण हुंडा घेणे आणि वरदक्षणा देणं ह्या भाषेला अंतर किती आहे पहा, वरदक्षिणा देणं ह्मणजे मुलीचे बापाचे खुषीचे काम आहे. व हुंडा घेणे ह्मणजे मुलाचे बापाचा जुलूम होय. असे मला वाटते. कारण मला शास्त्र माहीत नाही. भाषा येत नाही. मात्र लोकप्रचारावरून व चाललेल्या वहिवाटीवरून थोडेसें ध्यानांत येते. दानपात्रावर त्याचे योग्यतेची दक्षिणा दिली पाहजे. त्याशिवाय फळ नाही म्हणून कन्यादानावर दक्षिणेची योग्यता केली आहे. व मुलीचे बापाने अनुकूल असेल त्याप्रमाणे वरदक्षिणा द्यावी ती मुलाचे बापाने खुशीने घ्यावी व खुशाल वापरावी. कारण यथाशक्ति दानपात्राचा अंगिकार करून ममतेने तिला गृहिणी हे नाव दिल्यावर दोन्हीला अधिकारी झाली मग यत्किचित् हुंड्यांचें तेज तिथे नाही. ह्मणून तुह्मांला जड न पडतां आलेला हुंडा सुनेच्या किंवा मुलाच्या नांवाने जर संग्रह कराल तर सहजच तुमच्या मुलीचे कल्याण होणार आहे. आतां सुनेचे दुर्दैवाने जर