पान:विधवा दुःख निवेदन.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ २ ] विधवांची खरोखर स्थिति आहे असें बहुतेकांस आढळून येईल. ह्मणून मी हा लेख जनापुढे ठेविते. पण असी कामें बायकांच्या हातून शेवटाला जाणे ह्मणजे ईश्वराचेंच सहाय पाहिजे. कर्ता करविता ईश्वर आहे, निमित्त मात्र मनुष्य, मला विद्या नाही, ज्ञान नाही, मनुष्याचे सहाय नाहीं; हेतु तर फार मोठा; पण तो सिद्धिला जावा कसा ? प्रवासाला निवालेला मनुष्य कालांतराने फिरून परत येईल; पण जाऊं ह्मणणारा घरीच बसून राहील. ह्मणून मी माझें काम सुरू करते. यांत यश येऊन ते शेवटास जाणे ह्मणजे आमचे विद्वान बंधू व सुशिक्षित देशभगिनी यांवर अवलंबून आहे. - आतां आपण जेवलों, दुसऱ्याच्या जेवणाची पंचाईत कशाला, असे कोणीही ह्मणू नये. कारण, आपल्या पोटाहून दुसऱ्याच्या भुकेचा जो मनुष्य विचार करितो त्यालाच जन सुजाण व दयाळू ह्मणतात. तर प्रत्येक मनुष्याने आपल्या हातून हातांहोई तोपर्यंत आपल्या देशबांधवांचे दुःख निवारण करून देशाची सुधारणा करावी; ह्मणजे सर्वांचे कल्याण होऊन आपली सुकीर्ति होईल. त्याप्रमाणे आमचे विद्वान् देशबांधव करित आहेतच, पण अद्याप व्हावी तसी सुधारणा झाली नाही, असे मला वाटते. कारण आपल्या कुटुंबांतील कन्या व भगिनी कोणत्या सधारणेपासून सुखी रहातील व त्यांना कोणत्या प्रकारे हाल सोसण्याचा प्रसंग न येईल हे अद्याप आमचे विद्वान् बांध