पान:विधवा दुःख निवेदन.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[१५] कारण बलिष्ठ लोकांत बलहीन मनुष्य गेला तर त्यास यश कसं येईल ? पण गप्प बसून उपयोग नाही. कारण पुष्कळ लोक जमा करून गोंगाट केला ह्मणजे सहजच त्यांचे मनांस भीति उत्पन्न होऊन आपला पाय जरा मागे घेउन विचार करतील. नी कालांतरी सुखी होण्याची वेळ येईल. म्हणून तुमचा उद्योग चालला आहे तो ठीक आहे. म्हणून माझेविषयी तुमचे मनांत रोष येऊ देऊ नका. माझे माहेरची व सासरची मनुष्ये पुढारी असल्यामुळे बहुतेक वर्तमानपत्रे, मासिक पुस्तकें, घरी येतात आणि मलाही हौस असल्यामुळे मी नेहमी वाचीत असे म्हणून माझे दिरांनीही मला कधी प्रतिबंध केला नाही; इतकेच नव्हे तर जी वाचण्यायोग्य पत्रे व पुस्तकें ती आपण होऊन मनकडे पाठवीत असत म्हणून मला थोडी माहिती होती. मी भावांबरोबर बोलत बसले ह्मणजे केव्हांतरी मौजेनें हा वाद घालीत असे तोच याठिकाणी दिला आहे. मात्र मी मणते की हक्काची का असेना! तुझी परदेशी लोकांकडे भीक मागतो तर त्यांना तुमची दया कशी येणार ? ह्मणून मी तसे न कारतां माझ्या मायेच्या व स्वजातीच्या आणि योग्यतेच्या मनुष्यांकडे माझ्या देश भगिनीकरितां तुम्हांजवळ भीक मागते तर तुमी मला किती घालितां तें पहाणार आहे. व मी जे मागणार ते तुमचे तिजोरीपैर्की मागत नाही व फंडही जमा करा असे म्हणत नाही तर तुम्हीं देश सुधारणेसाठी रात्रंदिवस झटत आहां त्याप्रमाणे