पान:विधवा दुःख निवेदन.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ५३ ] तील तें खरं व बोलतील ती पूर्वदिशा. होतां होता ती गोष्ट मी पाहिली ती या त-हेला येऊन पोहोचली ह्मणून जवळ काहीतरी अर्थ पाहिजे. पण उपाय नाही. ही सर्व भिकूची हकिगत भावांचे व भाउजयाचे तोंडून ऐकतांच माझ्या स्थितीचं सर्व चित्र डोळ्यांपुढे उभे राहिले. कारण मी जरी सुखांत होते तरी पैशाचे मानाने माझी व भिकीची स्थिती एकच होती ह्मणून तिच्यावर जो प्रसंग तोच आपल्यावर असे समजून मनांत आलंकी. आपल्या देशांत नवीन नवीन रोग उत्पन्न होउन अकाली मृत्यू फार होऊ लागले त्यांत विशेष तरुण मुलांवर आढळतात. ह्मणून ह्याचा विचार आपले विद्वान बंधू करतील अशी आशा मुळीच नाही. ह्मणून मनांत येऊन मी बोलले की, का उपाय नाही केले तर सर्व होण्यासारखे आहे; परंतु मनांत मात्र आणले पाहिजे. पण तुमचे मनांत येणार कसं ? बरोबरच आहे की, याचकाविणे काय, खोळंबला दाता । तोची धांवे हीता आपूलिया॥ तुकाराम. झणून माझ्या अनाथ भगिनी साठी मीच तुह्मांजवळ भीक मागते. कारण तुही विद्वान आहांत. नेहमी तोंडानं लेक्चर व हातानं निबंध या शिवाय देशोन्नतीसाठी लाखोरुपये फंड जमाकरून राष्ट्रीयसभा भरवितां. आपले लोक व आदरसत्कार या साठी पुष्कळ परदेशी माल खरेदी करितां. दुसरें रेलवे कंपनीकडे सभेनिमित्य तुमचे पैसे