पान:विधवा दुःख निवेदन.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ५१ ] असून दोन शब्द चांगले बोलत, आणि इतकी जर तयारी नसेल तर दंगा कांही विचारूं नका. लगेच चवताळून हे आदळ तें आदळ व आपटा आपट गडी मनुष्यांवर काढून एकच दंगा होत असे. आणि मुद्दाम उशीर करायचा नी कोणी विचारलं की झालंका ? तर ह्मणे की होईल तेव्हां करीन माझं मला पुरे झालं आहे. गडबड असेल त्यानं करून घ्यावं, मी असंच करणार असें ह्मणून हश! हुश ! करून एकदां जेवण आटपलं की कृतकृत्य होई. अगदी नम्रपणानं शंभूराव ह्मणत इतका उशीर कां तर ह्मणे की माझा काका नव्हता आला, माझी तयारी करण्याला ? ह्या बोलण्याने भिकीला किती वाईट वाटे की, नेहमी करून एखादे वेळी कंटाळा केला तर इतका अनर्थ होतो ह्मणून रागानं केव्हां करी, केव्हां तरी करीत नसे. एकवेळ ती फार आजारी ह्मणून ती (बापूची बायको) समाचाराला गेली ती सांगत होती की शंभूराव दोनप्रहरी औषध व थोडेसें दूध देऊन कचेरीला गेले व ते घरी येईपर्यंत तसंच राहतं ह्मणून भिकू मधलेवेळी व्यावयाचे घेऊन आली. व आग्रह करूं लागली तेव्हां पार्वतीबाई ह्मणाल्या तुह्माला पहातां माझ्या अंगाची आग होते. व डोके फिरून जाऊन मला दुखणे येण्याचे कारण तेच झालं. माते हात जोडिते, मला तुझा श्राप लागुंदे नको व तुझें करणं मला नको. भिकी म्हणाली वहिनी तुला श्राप देऊन माझे कोणते हित मी करून घेणार ? म्हणून तूं मला बोलतेस. तुला माझा कंटाळा आला असेल