पान:विधवा दुःख निवेदन.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[४९] होणार. पण करतात काय. दुसरी मुलगी लग्नाला आली ते लग्न तरी झालं पाहिजे. आणि आपलीही तजवीज केली पाहिजे काही तरी. सर्व जिनसा जमा केलेल्या मात्र आपण होऊन लोकांना जरी सध्या पटलं की सहजच किंमत कमी होणार. पण जरूर असल्यामुळे निरुपाय झाला तरी ७/८०० शे रुपये आले त्यांतच थोडे बहुत लग्नाला लागले. बाकी तिचे पोटाची बगमी असेल नसेल. नणदेच लग्नाला भिकी गेले नाही. तिनं ते सर्व आईजवळ सांगितले व आई ह्मणाली मी तुला तिकडे पाठविणार नाही. मजकडे काही कमी नाहीं; स्वस्थ जेऊन खुशाल ऐस. ह्मणून पुन्हा भिकू सासरी गेली नाही. पण तिचे आईबाप एकदां खती घेऊन खंगले, नी क्षीण होत चालले. दिवसेदिवस आजारी होऊन ती उभयतां १५ दिवसांचे अंतराने स्वर्गवासी झाली. त्या वेळी शंभराव सुटीला गेले होते. ते तेथील सर्व व्यवस्था करून मिकू व आजीला घेऊन इकडे आले. इकडे आल्यास सुमारे २ वर्षे होतात. आल्यावर सहा महिने सुमार पार्वतीबाई चांगल्या होत्या. आणि ह्मणत की आपलेवांचून दुसरे त्यांना कोण आहे ? मूल ना बाळ, एकटा जीव. त्यांची मनुष्ये खुशाल राहोत. त्यांना काही कमी नाही. पण ही अक्षरें सदोदित जर मनांत असती तर शंभूरावांना सुख व आनंद झाला असता. पण ओढून ताणून आणलेली माया किती दिवस टिकणार ?