पान:विधवा दुःख निवेदन.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[४८] ह्मणून इथं त्याविषयी काही लिहीत नाही, व अशा प्रकारे आकाश कोसळल्यावर मग जी मनुष्ये पूर्वी लक्ष्मीबाईचा शब्द झेलत व त्या किती रागाने जरी असल्या व किती अविचाराने बोलल्या तरी त्यांचे कौतुक करीत तीच मनुष्य आतां तिच्या हांकेला जुमानत नाहीत. याप्रमाणे लक्ष्मीबाईचे संसाराचा अस्त झाल्यावर सर्व अपेश भिकूचे पायगुणावर येऊन ठेपलें. नी त्यापासून तिला त्रासही होऊ लागला. सासू वारंवार ह्मणे की ही पांढरे पायांची कुटली विळी घरांत आली तें घर धुवून टाकले. बसा आतां स्वस्थ. ही बातमी भिकूचे आईला कळतांच ती भिकीला घेऊन आली. नी तिला पहातांच आईनी बाप यांची जी स्थिती झाली ती लिहितां पुरवत नाही. त्यांना फारच पश्चात्ताप झाला की आपण मुलाचे सुद्धां मत न घेतां हौसेने केलं काय नी झालं काय. याचखंतीने ती उभयता क्षीण होत चालली. आतां भिकूचे अंगावर १००।२०० चा विषय होता. पण तो सासूने घेऊन आपले लोकांत जी भूषणास्पद चाल आहे ती अमलांत आणून तीस एका लुगड्याची मालकीण केली. मग अर्थातच भिकू कफल्लक माहेरी आली आणि तिकडे सासूजवळ जे काही उरलं होतं तें सर्व निरुपयोगी झाले. कारण आपण मुलगा आहे ह्मणून थोडं बहुत ठेवलं होतं. ते हे जरीचे कापड, शालजोड्या, चांदीची भांडी व बारीकसारीक अंगावरचे दागिने तरी ते वापरलेले. तेव्हां सहजच किंमत कमी ।