पान:विधवा दुःख निवेदन.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[४७] आहां. असो. ह्याप्रमाणं सर्व काढलं, पण जुन्या जिनमांना पैसे ते कितीसे येणार ? मग करते काय. सांगतील तें हूं ह्मणून व देतील ते घेऊन स्वस्थ बसणं माग. कारण सर्वच लोक करणार, करतील तें खरं. असो. इतकी स्थिती झाल्यावर बाळ जरा शद्धीवर आला व कांही तरी उद्योग करण्याचे मनांत येऊन एखादी नोकरी लावून द्या असें आपल्या वडिलांचे स्नेह्यांना सांगू लागला, पण नोकरी तरी कशी लागते, विद्या नाही. अभ्यास तरी होईना, म्हणून एका खेड्यांत स्टेशनावर १० रुपये महिना पगार ठरवून एकदा अडकला. आणि त्यानं दोन पगार आईकडे पाठविले ह्मणून लक्ष्मीबाईला ही दुःखांत सुख झाले की बाळानं आपली वाईट स्थिती लवकरच मागें सारिली ह्मणून फार आनंद झाला. पण म्हण आहे ना ? भिकेची हंडी शिक्याला | चढत नाही. ते अगदी खरं कारण विनायकरावांची मूळची स्थिती ह्मणजे ते फार गरीब त्यांत हे थोडे नांवारूपाला येऊन या भूमीवर थोडेसें तेज पडलें नाहीं तोंच चतुर्दशीच्या चंद्राप्रमाणे लगेच मावळले. पण इतकें होऊन तरी दुर्दैवाचे समाधान कुठं झालं? अमावास्येच्या | रात्रीप्रमाणे वंशवृद्धि व भाग्योदय या दोहींचा क्षय होऊन ह्या भूमीवर निर्वशरूप अंधःकार पडण्याची वेळ आली नी स्टेशनावर प्लेग होऊन बाळ वारला. दुर्दैवानें आपलें समाधान करून घेतले. आतां लक्ष्मीबाईच्या दुःखाचे वर्णन करण्याची बाकी राहिली नाही.