पान:विधवा दुःख निवेदन.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोठी मुलगी अगदी गळ्याला आली. ह्मणून तिथेच त्यांनी एकीचे लग्न केले. दिवसेदिवस गुण न येतां ते अशक्त झाले. मुलाचे विद्येचे दिवस फुकट जातात ह्मणून विनायकरावानी आपल्या गावी जाण्याचा बेत केला; पण खेड्यांत जाऊन तरी काय करितात तेथे शाळेची सोय नाही ह्मणून पुण्यांतच आपला पहिला वाडा सोडून दुसरे ठिकाणी लहानशी जागा घेऊन राहिले कारण आपल्या ओळखीचे मोठाले कामगार आपल्याला काही तरी उपयोगी पडतील व मुलाचे विद्येची व्यवस्था कांहीतरी त्यांचे कडूनच लावावी. ह्याच हेतूने ते पुण्यास येऊन राहिल्यावर त्यांचे भेटीला पुष्कळ लोक येत. त्यांचेजवळ विनायकराव बाळाचे विद्येविषयी बोलत. पण सर्व लोक ह्मणत की छे: तुझी अगदी काळजी करूं नका. बाळ आमचा मुलगा, तुमचा नव्हे अशी उमेद देत. परंतु उपयोगी पडतील तर शपथ. असो, याप्रमाणे पुण्यांत आल्यावर वर्षाचे आंतच त्यांची प्रकृती अधिक क्षीण होऊन त्यांना देवाज्ञा झाली. मग लक्ष्मीबाईला दुःख झालं खरं, पण बसून कसं चालतं. आलेला दिवस तरी भागला पाहिजे. ह्मणून आलेल्या मंडळी जवळ गोष्ट काढीत की कोच, खुा, पलंग, कपाट, तसबिरा, हंड्या, कांचेचे त-हेत-हेचे दिवे, शिवाय कांचेची व चिनई मातीची भांडी, ही सर्व लिलाव करून काय होईल ते पहा. माझी स्थिती काय आहे हे तुझी पहातांच