पान:विधवा दुःख निवेदन.pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विधवा दुःख निवेदन, Consoo.22 जननिजठरी गर्भासि येतां पय केलें निर्माण । ऐसें असतां या पोटाची कां करूं चिंता जाण ॥ हे जरी खरे आहे, तरी ईश्वर आपण येऊन कोणासही माप मोजून देत नाहीं; मनुष्या कडून देववितो. ह्मणून त्यांतही आपले ज्ञानाची थोडी भर घालून देशांत जी उणीव आहे, ती नाहीशी करणे विद्वानाचे काम आहे. पण चमत्कार हा की, विद्वान् आणि अज्ञानी, श्रीमान व दरिद्री हे सर्व लोक सारखे बनून राहिले आहेत. आभाळाला ठिगळ लावण्याची खटपट बरेच लोक करितात, पण आपले अंगांतील फाटलेल्या कपड्याला दोरा घालण्याची आठवण थोड्यांसच होते. त्याच प्रमाणे आमचे देशांतील विद्वान् लाकांची स्थिति आहे. स्त्रीशिक्षणाविषयी विद्वान लोक विशेष कळकळ दाखवितात; स्त्रियांना इंग्रजी शिकवितात? पण कोणच्या सुधारणे पासून कुटुंबांत आनंद राहून अनास्था न हाईल हे ध्यानात कसे येणार? कारण, जो पहावा तो बहुतेक चैनीत असतो. मागे पुढे पाहतो कोण ? राहिलेला वेळ राजकीय कामांत जातो, त्यामुळे फावत नाही व आठवणही होत नाही. | असो; ब्राह्मण विधवांची थोडी गा-हाणी जनापुढे मी ठेवितें | तिकडे लक्ष देणे विद्वानाचे काम आहे. हल्ली मी जी हकी गत लिहिणार आहे ती अक्षरशः खरी आहे. व तसीच