पान:विधवा दुःख निवेदन.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[४६ ] काय बाळ रिकामाच; हिंडण्याफिरण्याला मोकळाच. त्याचा उद्योग काय ह्मणाल नर नदीत पोहत राहणं, सेवेकन्यांची टवाळी करणं व संध्याकाळी भीमानदीवर हवा घेत फिरणं, उरला वेळ वाचीत बसणं. केव्हां तरी विनायकराव बोलत की, बाळ हिंडूं नको पुढे तुझ्या जन्माची वाट काय ? मी मिळविलेलें तें मीच संपविले. पहा बाबा विचार तुझा तूंच. लगेच लक्ष्मीबाई ह्मणे की तो तरी काय करील. शाळा ना सुळा हिंडतो झालं. घरांत येऊन बाळ ते मला वरचेवर बोलतात काही तरी वाचीत जा बरं, अग दीच विसरून जाशील, ह्मणून सांगते. तो ह्मणे शाळेत घाल ह्मणने मास्तर देतील ते वाचीन. अरे बाळा शाळा नसली ह्मणून दुसरें सुद्धां वाचूं नये का ? होय किती तरी कादंबऱ्या शिवाय नवीन नवीन नाटके आणून नेहमी वाचीत असतो. या बोलण्याने लक्ष्मीबाई नुसत्या हंसल्या नी उद्योगाला गेल्या. पहा, थोरांचा मुलगा लाडका त्यांत एकुलता एक, ह्मणूनच असे हुषार. कारण लहानपणापासून शिक्षणच तें की बाळ नाटक मागतो, द्या त्याला नाटक. शाळेला जाईल तो जाईल नाहीं तों नाही. जाईल मेला! त्याच जन्माला आला आहे. खेळुदे चार दिवस, आहेत कुठं मुलं ? या बोलण्यानं विनायकराव गप्प बसत. त्याचे फळ हल्ली मिळत आहे. या प्रमाणे दोन अडीच वर्षे गेली. बहुतेक जिनगी आटोक्यात आली. भिकीच्या दोन नणंदा आहेत ह्मणून मागे सांगितले आहे त्यांत