पान:विधवा दुःख निवेदन.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ४४ ] नेटिव वैद्यांकडून घेऊन पहा, पण तोही उपाय झाला तरी गुण नाही. शिवाय लक्ष्मीबाई घरांतल्या घरांत भटजींना विचारीत, तेव्हां ते ह्मणत की देवीचा राग आहे. त्याचे निवारण झाले. मग जोतिषांनी सांगितले की, ग्रहाची दानें करा. तीही झाली पण पहिला दिवस. विचारी लक्ष्मीबाई करते काय ? तिचे मन वाहूं लागले की कोणी काही सांगितले तरी पैशाकडे मागे पुढे न पाहतां सर्व करी. आणि म्हणे उद्यां बरे झाले म्हणजे पैसे मिळतील. एकदां बरे होऊदेत. आमच्यांत म्हण आहे की, दहा मरोत परंतु दहांचे पोषण करणारा जगो. त्या प्रमाणे सर्व तसे म्हणत पण तसे कसे होईल. शेवटी विनायकराव व ह्मणाले की मी आतां औषध ह्मणून घेणार नाही. काहीं असो. गाणगापुरास श्री दत्ताजवळ जाऊन रहातो तेथेच काय तें होउंद्या. मग त्यांची सर्व मंडळी तेथे जाऊन राहिली. आणि पदरमोड करीत; कारण घर ना दार शेत ना भात; जी इस्टेट ते सर्व सास्वासुनाचे दागिने. व थोडी चांदीची भांडी ही एक. दुसरी जिनगी ह्मणने हंड्या, दिवे, कांचेची कपाटें, कोच, खुया, टेवलें, तसबिरा, लोड, तक्के, गालिचे यांशिवाय बहुतेक निरुपयोगी सामान. घेतेवेळी खूब पैसा पडला पण देतेवेळी किती येणार ? असो. याप्रमाणे थोडें बहुत सामान लिलाव करून व बाकी सर्व अव्यवस्था करून सर्व नोकरांना रजा देउन गरीब स्थितीने तिथं जाऊन राहिले. नी पुढे उभयतां सेवेला गुंतली. मग