पान:विधवा दुःख निवेदन.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[४३ ] णीचे जेवणाची अशी गम्मत आहे की, पंक्तीत जिन्नस घेऊन आलेला वाढपी बेलाशक ओवळा करून हातांतील भांडे काढून घेतात, व पानांत अन्नाच्या राशी; म्हणजे जिन्नस पुरे म्हणून म्हणायचे नाही. गोरगरीवसुद्धा अशी अन्नाची नासाडी करितात. व त्याला भोम म्हणतात. आणि लग्न ठरते वेळी करार करितात की आमचे ३ किंवा ४ भोम झाले पाहिजेत. जितके मोठे तितकी अन्नाची नासाडी फार करितात. पहा केवढा अज्ञानपणा हा! मग सुधारणा ती कसली झाली ? पूर्वार्जित जो वेडेपणा तो तर तसाच आहे. मुलीचे बापाला जेरीला आणून त्यांनी वारंवार हातीं पायीं पडल्यापासून आपल्याला समाधान मानून घेणे म्हणजे काय भूषण असेल ते असो. या प्रमाणे भिकूताईचे लग्न झालं अंगावरही बरेच दागदागिने घातले होते. भिकूचे लग्नाला माहिना झाला किंवा नाही तोच तिच्या सासऱ्याला पन्नास ६० रुपये चढले. मग काय जो तो मुलीचा पायगुण चांगला म्हणू लागले. पण सहा महिने झाले नाही तोंच ताप येऊन अर्धाग लटके झाले. मग काय ? विलंब न करितां लौकरच गूण येईल ह्मणून खर्चाकडे न पहातां मोठमोठाले सर्जन व नामांकित डाक्टर आणून सुमारं वर्षभर सर्व उपाय करून थकले. शेवटी डाक्टर मणाले की गुण येण्याचं काही लक्षण दिसत नाहीं तुम्ही खर्च किती दिवस करणार ? ह्मणून आमचे औषध बंद ठेवा व तुमचे