पान:विधवा दुःख निवेदन.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[४२] हटलं मुहूर्त टळेल बोलू नये. आतां कांही गडबड नाही. आणा बाजा तेव्हां येईन झालं. आधी तजवीज नसल्या मुळे पैसे फार पडले, पण करतां काय आणला बाजा नी नेली समजाऊन. पुढे जेवणाची अक्षत आली. तेव्हां तसंच; की सर्व गांव माझे ओळखीचा; तेव्हां थोरांमोठ्यांच्या बायका माझे पंक्तीला आल्या पाहिजेत. म्हणून माझं एक मनुष्य देते नी तितकी घरे तुम्ही सांगा. पहा वाचकहो, ही चाल आमच्यांत किती हास्यास्पद घातली आहे! की गांवापरगांवचे आप्तइष्ट मंडळींना सुद्धा आदरसत्कार करण्याचा बोजा त्यांच्यावर लादण्यापेक्षां ते आपले भूषणाला करतील अगर सोडतील. त्यांचे मनांत नसतां अगांतुकीप्रमाणे त्यांचेवर लादण्यापेक्षा आपले घरी पक्वान्नं करून आपले आप्त व स्नेह्यांच्या बायका बोलावून आदरसत्कार करून त्यांना एकेक नारायणपेठी नेसिवलं तरी नको कोण म्हणतो; तर नुसत्या जेवणासाठी त्यांच्याकडे तोंड पसरणे म्हणजे फारच वाईट. पण ही गोष्ट आमच्या हौशी व उदार भगिनीच्या मनांत सुद्धा येत नाहीं; इतकेच नव्हे तर त्याहून आणिक एक चमत्कारिक चाल आहे; ती ही की पंक्तीत एखादा जिन्नस कमी असे वाटले की, तोच सर्वांनी मागावा. पण आपण हा याचकपणा काय म्हणून करतो हे व्याही मंडळीपैकी कोणाचेही मनांत येत नाही. याचप्रमाणं कर्नाटक प्रांतांतील लोकांत तरी विहि