पान:विधवा दुःख निवेदन.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[४१ ] आपण आहेच मागे. त्या दोघी चुकल्या तर त्यांचे मागून गुप्त त्यांच्या मैत्रिणी आहेतच. इतकी तयारी असल्यावर न्यून ते काय पडणार ? आणि तंट्याचा दुष्काळ तो कसला ? याप्रमाणे भिकूच्या सास्वेची तर तयारी झाली. मग रुखवत जातांच ते पाहून तिला फार राग आला; कारण पुण्याकडे रुखवत नेण्याची फार मोठी चाल असते. ती काही भिकीच्या आईला माहीत नव्हती. नेतेवेळी पुष्कळ नेलं होतं. पण शिप्तराची जमा फार थोडी होती, ह्मणून धुमत होती. हळद कुंकू होऊन ओटी जशी पुढे आली तशी ह्मणाली माझी ओटी भरूं नका. माझ्या मानकर्णी स्वयंपाक घरांत वीस आहेत. त्यांचे पढ़ें नारळ व विडे ठेऊन नमस्कार करून या. माझं माहेरचं कोणी आलं नाही, त्यांचे २५ नारळ ठेवा. उरला तर माझी ओंटी भरा. पहा विहीणबाईचे बोलणे किती शुभ आहे तें. आपलेपुढे सौभाग्यदायक ओंटी आली असतां तिचा अव्हेर करून माझी ओटी भरूंनका. आंतल्या बायकांना नारळ आधी द्या. ह्मणजे इतके जेव्हां नारळ त्यानी तयार करावेत तेव्हां विहिणीला एक घालावा. असो. याप्रमाणे रुखवत आटपलं. लग्नानंतर विहीण रुसून गेली, तिला समजूत करून आणतेवेळी तिनं हट्ट धरिला की मला इंग्रजी बाजा पाहिजे. लग्नाचेवेळी आपला खडबड वाजत करत नेला नवरा मुलगा. इतकं वेठीनं करण्याला का मुलाचं लग्न होत नव्हतं