पान:विधवा दुःख निवेदन.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[४ ] कारण, हा सोहळा ऐकवून पोरकटपणाबद्दल आमच्या सुशिक्षित भगिनींना सावध केल्यासारखे होईल. म्हणून ती सर्व हकिकत देते. भिकीच्या सास्वेच्या मनांत होतां होईल तो आपल्या विहिणीची फजिती करावी. माझे पुरूष तरी मला कांहीं बोलणार नाहीत. कारण मी लग्न ठरतेवेळीच कबूल करून घेतले आहे की मी हवं तें करणार. लग्नांत चार दिवस मला एक शब्द सुद्धां बोलतां कामानये. माझे मुलगे काही दोन चार नाहीत. हाच काय तो एकटा; ह्मणून माझे सर्व मान व हौस झाली पाहिजे. याप्रमाणे विहिणबाईनी आपल्या सखी समुदायांत हा बेत ठरविलाच. मग काय ! लग्नाला सुरवात होतांच ज्या बायकांना नवयाचा धाक नाही व उद्योग थोडा, त्यानी इकडच्या चहाड्या तिकडे, व तिकडच्या चहाड्या इकडे सांगून तंटा सुरू केला; इकडे होय बाई तुमचं खरं, आणि तिकडे हो, त्यांची चूक, त्यांनी असं करूं नये. याप्रमाणे दोन्ही मांडवांत गोंडा मिरवून गांवांत जाऊन दोन्ही विहिणींची टवाळी करण्याला पुन्हा तयारी आहेच. झालं, यापासून फायदा काय ह्मणाल तर चार दिवस जेवण व एखाद दुसरा खण व पांचपन्नास आल्या गेल्यांकडून खāस शिव्या हाच काय तो. आतां विहिणीचा प्रकार पाहिला तर तिचे अंगांत मंडपदेवता शिरलेली; मग काय विचारितां! करवलीला फूस देऊन पुढे करून