पान:विधवा दुःख निवेदन.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ३९ 7 गेले तरी चिंता नाही मुलगी सुस्थळी पडते, काळजी नाही ह्मणून ठरविले. शिवाय विहिणीचे बारीक सारीक मान पान करण्याचे कबूल केलं. असो. याप्रमाणे लग्न ठरले. पण विहिणीला वाटावं की इतक्या हुंड्यालायक आपले घरीं जिनगी तरी काय आहे? निदान त्यांना जर कबूल आहे तर आपणही संभावीतपणाने वागून त्यांना त्रास न देतां सुशील व सद्गुणी म्हणून घेऊ. पण छे: ते तर नाहीच; मात्र उलट विहीणबाईचे मनांत विचार येऊ लागले की आपण कोणचे वेळी विहिणीला अडवून धरावी. व कोणचेवेळी तिचा अपमान करावा ! व माझे मैत्रिणी देखत मजपुढे तिला कोणचे वेळी वांकवावी, असाच त्यांचा विचार. लग्नांतील सर्व माहिती तुला हवी असेल तर घरांत विचार म्हणजे सर्व काडिनकाडी माहिती मिळेल. असे सांगून बापू आपल्या उद्योगाला गेला. मला ते सर्व केव्हां ऐकेन असे झाले होते. मग जेवणखाण आटपतांच आमचे कथेला सुरवात झाली. वहिनी म्हणाली भिकूचे लग्नांत मी माहेरी होते म्हणून मला माहीत आहे. भिकूच्या सास्वेचा वाडाही आमचे शेजारी होता. म्हणून सर्व गम्मत पहाण्यास मिळाली; सर्व लग्नाचा सोहळा मी पाहिला व तिचे लग्नानंतर झालेला परिणाम भिकूकडून ऐकिला. व थोडा शंभुरावांकडून पुरुषांना (नवऱ्याला) कळला. ती सर्व हकिगत ऐकून मला असं वाटले की ही हकीगतसुद्धां पुस्तकांत देण्यासारखी आहे.