पान:विधवा दुःख निवेदन.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[३७ ] पुढे डोके टेंकतें. गप्प रहा, ही मी निघाले. शंभूरावाकडे पाहून ह्मणते, नवरा मेल्यावर माझ्यासारख्या ज्या निर्धन असतील त्यांना ममतेची मनुष्ये मुद्धां कशी वागवितात हे उदाहरण जगांत देण्याला सांपडेल. कारण माहेरी ऐवढ्या अपराधाबद्दल मेरू एवढी शिक्षा. मग अदूरद झेपणाने अथवा जुलमानें, दुराग्रहाने अथवा दुर्दैवामुळे, a · अथवा अंतःकरणांतील दुष्ट बुद्धीने एखादी गोष्ट आपले हातून चुकली तर याहून अधिक शिक्षा ती काय राहिली ? ममतेच्या व हक्काने राहण्याच्या घरांत सुशील व सद्गुणीमनुष्य टिकत नाही. मग एखादा दुर्गुणीमनुष्य क्षणभर तरी कसा टिकणार ? मायेचा एकही उपयोगी पडणार नाही. मग आपल्या मनुष्यांचा काय उपयोग झाला ? मी असा चमत्कार पहाते की मोल देऊन ठेविलेला नोकरसुद्धा त्यांना जवळ वाटतो पण ही अनाथ झालेली बायको काबाडकष्ट करणारी व बिनपगारी विश्वासूक नोकर असतां तिला सुख नाही. व तिजवर विश्वास नाही. हा केवढा चमत्कार पहा! आतां सर्वच तशी असें ह्मणत नाही. परंतु जिच्याजवळ पैसा नाही तिची बहुतेक स्थिती अशीच; ह्मणून तो तंटा पाहून मला फार वाईट वाटले. कारण माझ्या माहेरची व सासरची माणसे श्रीमान् होती; तशीच सद्गुणी होती ह्मणून मला फार सुखांत ठेविली होती. तो थोरपणा त्यांचा झाला; पण भिकीप्रमाणे जर माझे हातून एखादी गोष्ट झाली तर आपली स्थिती अशीच होगार याप्र