पान:विधवा दुःख निवेदन.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[३६] पैसा जाळण्यासाठी आली आहे. नीट रहाणार असेल तर राहुदे; नाहीतर मी आपली बहीण आणून ठेवणार. हिला तेल, शिगेकाई सुद्धां किती लागते, मी म्हणून सोसलें. निला वर्षांत एकदांसुद्धा तेलाची जरूर नाही, व शिकेकाईची गरज त्याहून नसतां हे बोलणं शंभूरावाना अगदी खरं वाटत होते. कारण ते चित्राप्रमाणे भिंतीला टेकून बायकोचं बोलणं ऐकून घेत होते, व मधून मधून तिला स्वस्थ हो, शांत हो, असं म्हणतहोते; कारण तिची मुद्राच तशी झाली होती. तोंडानं वाक्चातुर्य चाललं होतं, डोळ्यांनी पाण्याच्या धारा चालल्या होत्या, अंगाला कांपरा सुटला होता, अशी स्थिती पाहिल्यावर खरं कोग म्हणणार नाही ? भिकी भाउजयीला छळत नाही असे कोण म्हणेल ? मग प्रत्यक्ष नवऱ्यादेखत जर इतका आकांत केला तर खरं वाटणं साहजीकच आहे. शंभूराव सर्व ऐकून घेऊन भिकीवर तावदारून ह्मणाले चल माझ्या घरांतून; मी तुला आणन माझी चूक झाली. मी झटलें आतां फारदिवस झाले आहेत तेव्हां जमेल. पण तें अधिकच, कमी नाही, असो. चल ह्मणजे झालं. मिकी ह्मणाली चल ह्मणजे कुठे जाऊं? भीक माग, हवेते तें कर, ऊठ आधिं तंटा नको माझे घरांत. पार्वतीबाई ह्मणते, नशिबी असेल तर माग भीक. तशी भिकी ह्मणाली, वहिनी बोलू नको. हात जोडते; तुह्मी दोघे खुशाल नांदा. जीव देऊ नको व वीप खाऊ नको. तुझे