पान:विधवा दुःख निवेदन.pdf/3

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उद्देश. आताशा सर्वांचे डोळे आपल्या देशास उजित दशा कोणत्या योगाने येईल या गोष्टीकडे लागले आहेत. पण आमां ब्राह्मणांत स्त्रिया पतीच्या मरणानंतर कशा पक्कया पराधीन बनतात, त्यांचे हाल कोणत्या त-हेने होतात, व त्यापासून त्यांची सुटका कशी होईल याबद्दल निदान करावा तसा उद्योग आमच्या विद्वान बंधूनी केलेला दिसत नाही. यास्तव एक दोन ठळक प्रत्यक्ष घडलेल्या खन्या गोष्टी देऊन मी एक सहन होणारा उपाय सुचविला आहे. आमचे बंधू आपली थोडी अमोलिक वेळ खर्च करून हा निबंध एकवार वाचण्याची तसदी घेतील तर आपल्या घरची खरोखर स्थिती कशी आहे, ती त्यांच्या डोळ्यापुढे उभी राहील, व मी सुचविलेला मार्ग विचार करण्यासारखा आहे असे वाटल्यास ते तिकडे लक्ष देतील अशी बळकट आशा बाळगून हा निबंध मी त्यांचे पुढे ठेवितें. यांत ज्या गोष्टी दिल्या आहेत त्या हुबेहुब घडलेल्या आहेत. तर मी पुनः सांगते की एकवार हा निबंध वाचून पाहण्याची तसदी व्या इतकेंच माझं मागणे आहे. सिताबाई छत्रे. बेळगांव. १५ मुलै १९०१