पान:विधवा दुःख निवेदन.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[३६ 1 आजीने शंभूरावाला विचारिलें की भिकू भावाकडे जाती आहे मीही तिजबरोबर जाते. हे ऐकतांच शंभूराव गडबडले की अशा स्थितीत भिकी नी आनि जर तिकडे गेली तर भाऊ मला काय ह्मणतील! असा विचार करून वाय. कोला न विचारतां आपण स्वतः जाऊन भिकूला घेऊन आले. भिकू घरी आल्याबरोबर पहिल्याप्रमाण कामधंदा करूं लागली. आपल्या मत्ताखेरीज बहिणीला आणली ह्मणून पार्वतीबाईचे अंगाची आग होत असे. ती भांडणाची वाट पहात होती एकवेळ भिकूचं नी आजीचं बोलणं चाललं होतं; ते हिने ऐकल्या बरोबर ती वाघिणी सारखी चौताळून आली! मग काय विचारितां तिघींचें जुपलं व एकच दंगा सुरू झाला; तेव्हां माळीवर पुष्कळ लोक आले होते. तिथं यांची तोंडं ऐकू आली. ह्मणून शंभूराव खाली आले. तो यांना पहातांच पार्वतीबाईला फारच स्फुरण चढले नि वाक्चातुर्याची तर कमालच करून सोडली. तो थोडासा मासला इथं देते. “ नांदा आपल्या बहिणीला घेऊन नी करा संसार! मी निघून जातें ! किंवा विष खातें! नाहीतर जीव देते! मग तुह्मीं खुशाल बहिणीला घेऊन संसार करा. सगळ्यांचे छळून संपलं नि आतां हिचं राहिल आहे, ती घेउंदे छळून. यांचा किती ह्मणून छळ काढूं! माझी अब्रू घेतली, माझी मजा पाहण्यासाठी निघून गेली, आजपवतर मी केलेल्याचे उपकार फेडिले.. आपला पैसा जाळून टाकून आतां माझा