पान:विधवा दुःख निवेदन.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[३४] कशी येते पाहूं! भिकी मावशीकडे गेल्यावर लौकर बरी झाली व मावशीला ह्मणाली मी जाते. मावशी ह्मणाली तुला मी इतकी आजारी आणली असतां पार्वतीचा एक निरोप नाही, व शंभूराव इकडे फिरकले नाहीत; पाहूं बोलावतात की नाही स्वस्थ रहा. भिकू मावशीकडे गेल्यावर घरी फार हाल झाले, मुलगी फार आजारी पडली, व ब्राह्मण सोडून गेला. दुसरे ठेविले तरी महिनाभर टिकेनात, शंभुरावाचे जेवणाचे सुद्धां फार हाल होऊ लागले; पण बायकोचे विचाराशिवाय बोलावणं धाडतात कसे ? व हिचा तरी निश्चय प्राण गेलातरी भिकीला आणणार नाही. मावशीचा नियम बोलावल्याखेरीज पाठविणार नाही. झाले हाल कुणाचे? भिकीचे. तिच्या लुगड्याच्या अगदी बत्त्या उडाल्या ह्मणून तिने शंभुरावाकडे निरोप पाठविण्याचा विचार केला. परंतु वहिनी काय हवें तें बोलतील ह्मणून तिने वहिनीकडे एका मुला बरोबर निरोप पाठविला की, लगहीं अगदी फाटली ह्मणून दादांना सांगून घेऊन दे. हा निरोप ऐकतांच, हं ये झणावं आतां नि घे ह्मणावं लुगडी. पुरुष घेऊन देतात कसे बघतें, मावशीकडे राबून खाते नी मजकडे लुगडी मागते. पडलाय माझा खोळंबा ! पाहूं आतां कशी लुगडी नेसतेती? झालं सर्व उपाय थकला नी मावशीजवळ किती दिवस रहाणार, ह्मणून भिकूने वडील भावाकडे जाण्याचा निश्चय केला. आजीला सांगून पाठविले की, मी भावाकडे जाणार तूं येणार तर ये.