पान:विधवा दुःख निवेदन.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[३३ ] की अहो तुह्मांला मूलबाळ संभाळण्याला मनुष्य मिळत नाहीका ? की झाली सुरवात. मी कोणा हव्या त्यांच्याकडून करून घेईन; शेजाऱ्यापाजाऱ्याकडून करून घेईन, त्यांचे उपकार फेडीन. पैसा टाकल्यावर कोण हवें तें करील. ही गेली तर आमी उपाशींच की नाही. असली असल्यापेक्षा नसलेली बरी. सदासर्वदां ह्या बोल ण्यामुळे बिचारी भिकी कंटाळून गेली. परंतु करते काय व जाते कुठं. अशा स्थितीतच तिला दुखणे आले. मग काय विचारिता; पार्वतीबाईचे हातून काम होईनासे झालें, व भिकीच्या उपासावर येऊन टेपले. आपल्या हातून काम होत नाही तर उपास कशाला करावेत ? आणि दुखण्याने पडावें ? हीच दुखण्याची सुश्रुशा; भिकी आपल्या हातून होईल ते काम करून पडून राही; गावांतच तिची चुलत मावशी होती, ती फार गरीब होती. ती केव्हां केव्हां इचेकडे येत असे.ती सहज आली, व भिकूची अशी दुर्दशा पाहून तिला ह्मणाली मनकडे चल. आणि बरी झालीस ह्मणजे ये. कां पार्वतीबाई हिला नेते मी आठ दिवस. न्याकी मला काय विचारतां ? मी कोण घरांतली ? बरं, हिच लुगडं तरी कुठं आहे ? मला नाही माहित, विचारा नि न्या शोधून. पार्वतीबाईचा स्वभाव मावशीना माहीत होता, ह्मणून शंभुराव बसलेल्या माडीवर गेल्या व त्यांना विचारून भिकूला घेऊन गेल्या. भीकीही जातेवेळी वयनीला विचारून गेली नाही. मग काय, हिला सांपडलं. मला विचारल्या खेरीज गेली. आतां घरांत M