पान:विधवा दुःख निवेदन.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[३१] पाहून ) खरंच तें; ऊठ, आह्मी दो वर निजू, ह्मणून दामोदरला घेऊन वर गेले. शाग्रीताचें काम आटपतांच आह्मी खिडक्या दरवाजे बंद करून निजलों. दुसरे दिवशी सकाळी आपले उद्योग आटपल्यावर मुलगे चहा घेत होते तेथे मी बसले होते. इतक्यांत मागल्या चौकांत कसलासा . तंटा ऐकू येऊ लागला. ह्मणून मी विचारिलें, हे काय ? तोंडे कोणाची ऐकू येतात ? तो ह्मणाला, तें कांहीं विचारूं नको. आमांला जे स्नेही गांठ पडले आहेत ते अगदी शिक्षण घेण्यासारखे आहेत. इतकें ह्मणतांच कोणीलोक बाहेर आले ह्मणून तो निघून गेला. मग मला आंतून सर्व पत्ता लागला. ती हकीगत पुढे देते. बापू राहत असलेला वाडा फार मोठा होता ह्मणून अर्धा वाडा यांच्या जवळ होता व अर्ध्या वाड्यांत कोणी मोठे कामगार होते. त्यांना २००।२५० रुपये पगार होता. त्यांचे घरांत मंडळी फार नव्हती. शंभुराव, त्यांची बायको पार्वतीबाई, त्यांची आई व आजी, एक विधवा भिकी या नांवाची बहीण आणि दोन मुले, इतकीच मंडळी असून पगार एवढा मोठा; परंतु घरांत नेहमी तंटा. शंभुरावाचा एक वडील भाऊ होता, पण तो गरीब असल्यामुळे लांब असे; आजी पहिल्यापासून यांचेचजवळ होती व बहीणीचा नवरा मरून सासरची वाताहात झाल्यामुळे ती यांचेचजवळ होती. पार्वतीबाई ही दुसरी बायको असून, लाडकी; ती करील ती पूर्वदिशा. सासू व नणंद तिला नद्रेपुढे सुद्ध नको होती.