पान:विधवा दुःख निवेदन.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[३०] आपण जवळ बसला. व मला ह्मणाला मनुताई तुलामात्र फार भूक लागली असेल. गणूनं दशमी लाडू खाल्ले असतील. तूं काय खालेस? मी ह्मणाले मी सुद्धा पुष्कळ खालं. आईनं बदामाच्या वड्या व खसखशीचे लाडू दिले होते. शिवाय यांच्या चहाच्या प्टोववर दूध तापवून घेत होते; व प्रत्येक स्टेशनावर नवीन फळफळावक व गोमांतकी, अपूस, पायरीचे आंवे घेत होते; आणखी तुला सुद्धां आणले आहेत. पण दामोदर (बापूचा मुलगा) कुठे आहे ? इतक्यांत शिपाई त्याला घेऊन आला. त्याला पहातांच म्हणतो पाहिलेत का, आत्याबाई आल्या आहेत, आईनं तुला पुष्कळ खाऊ पाठविला आहे. ते कोण ह्मणतांच तो ह्मणाला गणूकाका? ही नव्हे आत्याबाई आमची; दुसरी आहे. ह्मणजे आई जातेवेळी धाकटी बहीण नेत होती. तीच त्याला माहित. इतकं आमचं बोलणं चाललं आहे तो आंतून बर्दी आली; वन्सं उठा, आंग धुवा, स्वयंपाक झाला; इतकें म्हणतांच आमी उठलों व आपापले उद्योगाला गेलो. जेवणं, खाणं, झाल्यावर पुन्हा बापू ह्मणाला, मनूताई, येतेसना बाहेर. तशी वहिनी लगेच ह्मणाली की, वन्सं आमचं तुमचं थोडं नातं आहे बरं का ! इथं बसलो तरी काही हरकत नाही. तो लगेच गणपती ह्मणाला वयनीचे जेवण होईतोपर्यंत बसुंदेत तिथं. दोघे गेल्यावर बराच वेळ आमच्या गोष्टी झाल्यावर मी बाहेर गेलें व ह्मणालें गणपती नीज आतां जाग्रण रात्री झालं आहे. बापू ह्मणाला ( बायकोकडे