पान:विधवा दुःख निवेदन.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[२९] ल्यामुळे रस्त्यांत दाटी फार होती ह्मणून मार्केटांतील देखावा, जाणायेणारे लोक व इमारती पहात पहात आमची गाडी अगदी सावकाश नेण्याला सांगितली होती; आह्मांला घरी येण्याला फार वेळ लागला ह्मणून बापू बायकोजवळ म्हणत होता की, स्टेशनावरून गाड्या आल्या पण आमची गाडी अझून कशी आली नाही व शिपाई सुद्धां कसा आला नाही ? बरोबर सहा वाजले. इतकें बोलत आहेत तो आमची गाडी उभी राहिली. दरवाज्यापुढे एक लहानसा बाग करून फुलझाडे वगैरे लावून राहुटीमध्ये ४ खुा २ कोच टाकले होते. व आपण एका इझिचेअरवर अतिशय उकाडा होत असल्यामुळे मलमली सद्रा घालून वर्तमानपत्र वाचीत पडला होता. गाडी थांबलेला आवाज ऐकतांच एका हातांत वर्तमानपत्र व एका हाताने डोके खाजवीत बाहेर आला व आमाला पहातांच गाडीजवळ येऊन हंसत ह्मणाला, मला वाटलं की आज तुह्मीं येत नाही. गाडी तर केव्हांच आली. गणपती ह्मणाला ते खरं, बाजारामुळे पेठा, दुकानें, मार्केट पहात पहात सावकाश गाडी आणली दुसरे काय. त्याची बायको जवळच होती; तिने मला पाहतांच एकदम पाण्याचा तांब्या पुढे ठेविला व आंत या ह्मणाली. तो लगेच बायकोकडे पाहून बापू ह्मणाला, या कशाला? लवकर स्वयंपाक होउंद्या. ती उपाशी आहे, असे ह्मणून त्याने माझा हात धरून मला कोचावर बसवून