पान:विधवा दुःख निवेदन.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[२८] मनुताई सुद्धां येणार; अगदी ठरलं. आई ह्मणाली मनूचं ठरलं खरं, परंतु मला नाही खरं वाटत. मी जातेतेळी किती तरी आग्रह केला. बापूचे सुद्धा पत्र तिला आले. जावं हे चांगलं. आपली आहेत ह्मणून बोलावतात, तुला तरी कुठं जाणं ना येणं; त्यालाही बरं वाटेल. लगेच मी मटलें नको बाई. भाऊजी काहीतरी ह्मणतील. तो म्हणला ती काळजी तूं अगदीं करूं नको, मी विचारून येतो. झालं दुसऱ्या दिवशी पाहटे विचारून आला; मग माझं काय चालते. मुकाट्याने जाण्याची वेळ आली. दुसरे दिवशी मेलच्या गाडीला निघतेतेळी वाटेत सांगण्यासारखें कांही घेतले नव्हते; मात्र आईनें गणपतीसाठी पुऱ्या, श्रीखंड, बाकीचे थोडे थोडे फराळाचे व फळफळावळ दिली होती. नंतर आमी वाटेने मुंबईस मात्र उतरून एके स्नेहाचे घरी जेवण केले. पुन्हां कांहीं फळफळावळ घेऊन निघालो ते थेट उमरावती येईपर्यंत उतरलों नाही. तेथे ४ वाजतां गाडी स्टेशनावर पोहोचली. गाडी थांबतांच प्रेस मधून आलेला शिपाई आमचा शोध करीत उभा आहे; गणपतीने त्याला पहातांच हाक मारिली. तो लगेच त्याने येऊन सामान उचलले. टांगा पाहून ठेवलाच होता. मी आपली शाल घेतली व त्यानी आपली मनीब्याग गळ्यांत घातली; शिपाई सामान घेऊन पुढे चालला. त्याचे मागून आमीं कडे तिकडे न पहातां गाडीत येऊन बसलो. तो दिवस व राचा अस