पान:विधवा दुःख निवेदन.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ २७ ह्मणे मी तुझी, एक किंवा दोन वर्षांनी उमरावतीचा भाउही इकडे येतो. केव्हां केव्हां पत्रेही येतात. त्यांच्या चवघ्या पांच मुलींमध्ये एकीलाही लिहिणे वाचणे, येत नव्हते. मीच सासरी गेल्यावर चार अक्षरे शिकले, त्यामुळे माझे भावांना मोठं कौतुक वाटे. व उमरावतीचा भाऊ ह्मणून दाखवी की, मला मोठी हौस आहे की, आपण बहिणीला पत्रं लिहावी, व तिने त्यांची उत्तरे पाठवावी. त्याप्रमाणे मी त्याला पत्र पाठविल्याबरोबर सर्वांचे आधीं तो मला उत्तर पाठवी. उमरावतीचे भावाहून एक लहान भाऊ आहे. त्याचे नांव गणपती. त्याची २४ सावे वर्षी एल. एल. बी. ची परिक्षा पास झाली. व तो घरी येऊन, एक महिना स्वस्थ राहिला; नंतर तो कंटाळला, कारण नेहमी त्याला शहरांत राहण्याची संवय; त्याला खेड्यांत कुठून चैन पडणार! मी तिथं एक महिनाभर राहण्याकरितां गेले होते. एकेदिवशी तो माझ्या बरोबर बोलतां बोलतां ह्मणाला की मला दोन महिने कुठं तरी जावेसे वाटते आहे. मीही थट्टेने झटलें की चल मलासुद्धां कंटाळा आला आहे; उमरावतीला बापूकडे जाऊया. तुलाही आतां मुंबईला जाण्याची गडबड नाही. मात्र फार दिवस राहिला नाहीस तर मी येते. झालं; एवढे त्याला पुरे; तो लगेच ह्मणाला की हे खरे आहे ना ? माझी उद्या तयारी आहे. चल तर आतां. बोलणे फिरवितां कामानये. आईला हांक मारून, ऐकलंस का आई, उद्यां माझमरावतीला निघणार. व माझ्या बरोबर