पान:विधवा दुःख निवेदन.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[२६] असे प्रसंग येऊ देऊ नये. कारण आपल्या घरांत । सर्वांची स्थिती चांगली असून एकीनेच येवढे कसे दीन व्हावें ! यापेक्षा एखाद्या गरीबाचे घरीं जरी जन्म झाला तरी बरें. कारण कावळा आपले मेळ्यांत बसला ह्मणजे त्याला आपण वाईट आहों हे बिलकूल समजत नाही पण राजहंसांत बसण्याची वेळ आली ह्मणजे आपले अमंगळ स्थितीचे त्याला फार वाईट वाटते. व जनालाही शंका वाटते की, राजहंसांत कावळा कुठून आला ? ह्याप्रमाणे स्थिती असते. मलामात्र सर्व मंडळी चांगले करीत. मी बहुतेक सासरीच असे. माहेरी केव्हां तरी जात येत असे. माझेसखे भाऊ व चुलतभाऊ मजवर फार ममता करीत. माझा एक चुलतभाऊ गीरणीवर उमरावतीस आहे ह्मणून मागे सांगितलेच आहे; तिकडे आमची मंडळी वारंवार जातयेत असत. बहुतेक मे महिन्यांत जात आणि आईही जातेवेळी मला फार आग्रह करी की, चल एक महिनाभर राहूं, व मुलांचेच बरोबर येऊ! पण मी नेहमी टाळाटाळी करी की काय ह्मणून हात हालवीत जावं! गेल्यासारखे एखादी भाऊजयीला चोळी शिवेन ह्मणजे काही नाही उलट आपला जाण्यायेण्याचा २०॥ २५ रुपये खर्च त्यांचेवर घालावा, व गेल्यावर ते काहींतरी एखादें लुगडे देणार ! मग कारणाखेरीज रिकामा खचे दुसऱ्यावर कां घालावा ? मी काहीतरी सबब सांगे व आई