पान:विधवा दुःख निवेदन.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[२५] लोकांवर अवलंबून ! एका पैशासाठी किंवा एका लुगड्यासाठी लोकांचे तोंडाकडे बघावे लागते. माहेरच्या व सासरच्या कुटुंबांत मी एकटीच कशी दुर्भागी जन्मले? एका काडीची सत्ता नाही, नि दमडीची जिनगी नाही. मग मला चांगुलपणा तो कुठून येणार ? त्यांत माझ्या मुलीचे जावांनी केलें; हे उपकार माझ्या डोकीवर असतांना उलट लुगड्यासाठीही नेहमी त्यांचेजवळ आगांतुकी आहेच. पण करता काय इलाज नाहीं; ह्मणून मला लुगडे मागण्याची वेळ आली ह्मणजे प्राणावर येई, हे माझें सांगणे वाचकांना खरे वाटणार नाही. पण माझ्यासारखी जिची स्थिती असेल, तिलाच खरे वाटेल. असो; या स्थितीबद्दल मला फार वाईट वाटे व नेहमी मनांत घोळे की, मोठ्या घराण्यांतल्या मुलींवर लहानपणी जरी वाईट प्रसंग आले तरी इतकी कंगाल स्थिती असणे ह्मणजे फारच वाईट. मणून तिच्याजवळ थोडा बहुत सत्तेचा पैसा पाहिजे. हा विचार मुलीचे बापाने करावा. कारण जरी तिचे दागिने असले तरी तिची दागिन्यावर सत्ता नसते. व सत्ता येण्याला फारच गोंधळ पडतो. ह्मणून हुंडा देतेवेळी निदान थोडीतरी रकम जर मुलीचे नांवाने दिली, तर पैसा शिल्लक राहील, घेणाराचा लोभ कमी होईल. व देणाऱ्यांचे मलीचे कल्याण होईल; असे नेहमीं मला वाटत असे. परंतु उपयोग काय ह्मणून मी गप्पच होते; तरी मी नेहमी भावांचे बरोबर वाद घालत असे की, पुढे तरी सुधारणा करावी, व मुलींवर