पान:विधवा दुःख निवेदन.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[२४] व आमच्या पैशाचा निकाल वाचकांना मागें सांगितलाच आहे. त्याप्रमाणे आमी एकदांच कफल्लक होऊन पराधीन झालो, तरी आमचे घरची मंडळी भुशील असल्यामुळे मला त्रास झाला नाही. माझ्या मुलीला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू दिली नाही. ती उपवर होतांच आपल्या योग्यतेप्रमाणे व मला समाधान होण्यासारखे तिला उत्तम घर पाहून मोठ्या समारंभाने तिचे लग्न केलें; माझ्या मुलीचा सर्व बोजा कायतो मधल्या भावोजींवरच पडला. कारण त्यांना दुसऱ्या बायको पासून मुलबाळ काही झाले नव्हतें. पहिल्या बायकोची एक मुलगी होती, येवढेच कायतें अपत्य. ती मुलगी फारच सद्गुणी व समंजस होती. माझे वडील दीर नेहमी खेडीपाडी हिंडण्याच्या व बदलीच्या गोंधळांत असल्यामुळे त्यांच्या मुलाचीसुद्धा बहुतेक कार्य यांचे हातून झाली. त्यांत मधल्या जावेला मुलबाळ नसल्यामुळे, आमच्या मुलीचे वरचेवर देणेघेणे, पुढे होऊन भावोजी अत्यंत उत्सुकतेने करीत असत. जणूंकाय आपले मुलीपेक्षां कांकणभर जास्त केले, परंतु कमी केले नाही. असो; याप्रमाणे आमची सर्व व्यवस्था ठीक चालली होती. पण मला त्या. पासून फारच मिणदेपणा वाटत असे कारण माझेकडे त्यांना उतराई करण्याजोगें कांहींच कसे साधन नाही ह्मणून फार वाईट वाटे, व क्षणांत वाटे काय झालं केलं ह्मणून ! वडील जावेच्या मुलाचे नाहींका केलं ? मग माझं तरी कोणी नाहींच करणार ! व लगेच वाटे की, छिः काय जिणे, आपला सर्व जन्म