पान:विधवा दुःख निवेदन.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[२३] वरि वरि भगवा झाला नाम । अंतरी वश केला काम ।। तया ह्यानये साधू । जगीं विटंबना बाधू ॥ २॥ (मुक्तेश्वर.) याचप्रमाणे स्थिती आहे; तर जी बायको पतिव्रता धर्माने वागणार ती पलंगावर निजो अथवा अलंकार घालो अंतःकरणा पासून जी शुद्ध आहे तिला तुमचे नियम बिलकूल लागू नाहीत. नाहीतर अशा बायका इतक्या आहेत, की अक्षयीं वेदांत भाषण करून व देवळांत जाऊन पुराण ऐकणाऱ्या मोजतां येणार नाहीत. त्यासाठी ह्मणते की हा अवीट व अमंगळ धर्म सोडा आणि जी गोष्ट एकवेळ केली ती पुन्हां करण्याचा प्रसंग येऊ नये असा एखादा नियम शोधून काढा. व आपल्या विद्वान भगिनी कडून वाईट गोष्ट न होण्या सारखे काही तरी उपाय करवाह्मणजे जगांतील अर्धा अधर्म कमी होईल. मला या गोष्टीचा मोठा त्रास आहे. पण उपाय काय ? कारण आपलें जिणे ह्मणजे सर्व लोकांवर अवलंबून आहे. ह्मणून त्याप्रमाणे वागणे भाग पडते, कारण जवळ पैसा नाही. माहेरची व सासरची नामांकित आणि मला जर त्या ठिकाणी राहणे भाग तर त्याप्रमाणे वागलेच पाहिजे. त्यांत दोन प्रकार आहेत. जवळ जर पैसा असेल तर तिला कोणी तरी वचकते व थोडे थोडे तिच्या मत्ताने वागतात मग.. आमाला कोण विचारणार ? माझ्या दागिन्याची व्यवस्था