पान:विधवा दुःख निवेदन.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[२२] मिळतात पाहूं. माझें मत धर्माविरूद्ध वागण्याचे बिलकूल नाही. मात्र मी येवढेच ह्मणते की, प्राचिन सर्व नियम सोडून कलियुगांत एकच नेम अमलांत आणल्यापासून नवयाला सुगती व स्वकुलाचा उद्धार होत असेल तर आह्मीं कबूल आहोत; मात्र चालू आहे हा नेम सोडून दुसरा एखादा नेम चालू ठेवा; कारण या नेमापासून पातिव्रत्यपणांत नांव गाडले गेले, असे मात्र समजू नका. आणि मीही याविषयी अधिक उल्लेख करीत नाही. कारण जगांत काय चालले आहे तें तुह्मीं पहातांच आहां. माझें मन सुधारू लोकांत नाही. परंतु हल्ली लहान लहान मुलींवर वारंवार असे प्रसंग येऊ लागले तर त्यांचे अंगांत दुर्दर्शितपणा किती असणार ? वाईट प्रसंग येण्याचा संभव आहे. हे एक. दुसरें असे की, तुह्मीच पहा, आपले घरांत स्नेहाशी किंवा बाळ मित्राशी जर आमी बोललो तर घरांतील मनुष्ये पुटपुट करीतात की काय बाईतरी दिवसांदिवस माणसाने ताळ सोडिला. परवां नुक्ती अशी झाली आणि त्यांच्याशी खुशाल बोलत बसली. आपण तीताटी मुलगी; कशाला त्यांच्याशी बोलावं? पण मी विच्यारितें तुमची तीताटी मुलगी एखाद्या नीच जातीच्या हलकट मनुष्यावर एकीकडे महिना पंधरा दिवसांनी कसे विसंवता ? या तुमच्या धेडगुजरी बद्दल मला मोठे हसू येते.