पान:विधवा दुःख निवेदन.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[२१] सर्व नेम सोडून हा एकच नेम अमलात आणला आहे. घरांत सकेशाबाई असली, की केली भटांनी निंदेला सुरवात. आणि तिला कोणी शिवू नये. तिचे पाणीसुद्धा कोणी घेऊ नये. मणजे तिला शूद्रिणीप्रमाणे वागवितात; बरं हा नेम जर प्राचीन ह्मणावा तर नैषध राजाच्या सिमंतिणीचा चित्रांगद यमुनेंत बुडाला तेव्हां ती सकेशा राहून श्री शिवाराधना करीत होती, त्यावेळी मोठमोठाले महान तपस्वी ऋषी असून हा नेम कसा विसरले? आणि तिच्या केसाच्या थेंबानीं त्याला पाताळांत कसा नर्कवास प्राप्त झाला नाही ? ते ऋषी राजाच्या आश्रयाखाली असल्यामुळे गप्प होते ह्मणावं तर ते बसल्या ठिकाणी अन्न व अग्नि उत्पन्न करीत. ह्मणून त्यांना राजाश्रयाची जरूर नव्हती. आणि त्याना वेदपठणांमुळे फावत नसे. आतां नांवाचे वेदमूर्ति; त्यांचा धंदा मटला ह्मणजे पक्वान्न खाऊन स्वयंपाकाची, दक्षिणेची नाहीतर लोकांच्या क्षुल्लक गोष्टीची निंदा करीत वेश्यांच्या कट्टयांवर चंची सोडून तंबाखू चोळीत बसल्याखेरीज दुसरा उद्योग थोडाच. आतां सर्वच तसे असतील असें मी ह्मणत नाही. परंतु अभंग बोले तैसा चाले॥ त्याची वंदावी पाऊलें। तुकाराम असे भट तुझी भटांकडूनच शोधून आणवा. किती