पान:विधवा दुःख निवेदन.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[२०] वाटे पण उपयोग काय ? वय लहान व पोरगी एक. ह्मणून कुठे जाणार ! व काय करणार !! मला नंतर माहेरी नेली, पण मला तेथे रहाणे बरं वाटेना, कारण माहेरी आई ना बाप. सर्व जन्म दुसऱ्यावर अवलंबून मग कोणावर तरी अवलंबून राहूं ? मात्र सासरी राहिल्यापासून माहेरच्यांना व आपल्याला अधिक भूषण असे वाटल्यावरून मी सासरी येऊन राहिले. जो आमचे लोकांत सोवळी करण्याचा धर्भ माजवून ठेविला आहे, तो एकदांचा उरकून घेतला. त्यामुळे आमचे घर पवित्र मानले गेले. धर्मामधील सर्व बाकीचे नियम आमचे विद्वान बंधू आणि वेदमूर्ति ब्राह्मण विसरले गेले. मात्र हा धर्म त्यानी पक्का ध्यानात ठेविला आहे. परंतु मला नियम माहीत आहेत. तिने एक धान्य खावें. भमिवर शयन करावें. पांढरे नेसावें. जसे काळे वर्ज तसे तांबडे वर्ज. असे धर्मामधील नेम अनेक आहेत. आपले मुलाखेरीज इतरांशी बोलू नये, आणि पोटभर जेऊं नये; कारण पोटभर जेवण व आंगभर वस्त्र मिळाले झणजे तिला अनेक सुखांची इच्छा होते. ह्मणून अल्प आहार व पांढरेवस्त्र नेसून रहावे. व आत्महत्या होऊं नये ह्मणून जिवाचे रक्षण करावें. तांबडी चंद्रकळा अथवा अलवान नेसण्याला कुठेही सांगितली नाहीत. अशारीतीने जिला रहाणे असेल तिनें रहावें. किंवा सती जावें असा नेम पूर्वी दचात्रयानी सांगितला होता; त्याच्या हाताचा हा नेम मळीच नव्हता. हल्ली हा धर्म स्थापन करणान्या ब्राह्मणानी नेसण्याला कुठेही रा. तांबडी चकत्या होऊ नये ही