पान:विधवा दुःख निवेदन.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[१९] मला त्यांच्याशी फारसें बोलण्यास धीर होत नसे; तरी एखादेवेळ दोन शब्द सांगत असे त्यावर उत्तर मिळे की, होय खरें तें; या तारखेपासून पैन पै रक्कम जमा करून घरांत आणून देतो मग तरी झाले ना ? ते मला अगदी खरखरं वाटत असे व सासबाईना त्याचप्रमाणे उत्तर मिळे, परंतु तारीखेस व शब्दाला जुळत नसे तरी मला ते खरे वाटे; कारण आपल्या प्रीतीचे मनुष्याने आपल्याजवळ किती जरी गप्पा ठोकल्या आणि वारंवार खोया होत असल्या तरी सांगितलेल्या वेळेला त्या आपल्याला अगदी • खऱ्या वाटतात. त्याप्रमाणे मला अगदी खरे वाटे. पण घरांतील मंडळी बोलली ह्मणजे वाईट वाटे, परंतु उपाय नाही. अशा रीतीने आमचे वर्तन असल्यामुळे घरांतील मंडळीचे प्रेम ते आमच्यावर किती असणार ? मात्र आमचें उभयतांचे मन अगदी एक असल्यामुळे मला घरांतील मनुष्यांची फारशी फिकीर वाटत नसे. जाउंदे, आपले दोन दिवस आहेत, असे वाटून मी आनदांत असे; परंतु ते तरी माझ्या दुर्दैवाला कुठे पत्करिलें ? दोन दिवस ताप येऊन त्यांच्यावर मृत्यूने घाला घातला. मग काय ? मी में कांही नेहमी मनांत ह्मणे, की दोन दिवस आपले आहेत जाउं दे. त्याप्रमाणे माझे सुखाचे दोन दिवस संपले आणि मी अक्षयी दुर्दैवाची नवरी होऊन राहिले; परंतु मनांत वाटे की, ज्या घरांत आपण सर्वांना अधिक वाटत होतो तेथेच आतां जन्म काढण्याची वेळ आली. ह्मणन फार वाईट