पान:विधवा दुःख निवेदन.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[१८] फागले, आणि त्यांनीही १०।२० हजारांची इस्टेट मिळविली वाचकहो, माझे माहेरची श्रीमंती होती व सासरची गरीबी होती असे समजू नका. कारण त्यांची जमीननुमला, व्यापार जरी नव्हता, तरी मिळकत पुष्कळ होती, ह्मणजे आमचे थोरले भावोजी मामलेदार आणि दुसरे वकील ह्मणजे नांवचे नव्हते, तर सर्व वकिलांत पुढारी व मानस्त होते. आमच्या माहेरची व सासरची अशी नरी श्रीमंती होती तरी उभयतां आलीं श्रीमंतीला अलिप्त होतों अथवा दिवस पोचले नाहीत मटले तरी चालेल; कारण माझ्या वयाला १५ वर्षे होतांच एक मुलगी झाली. आणि मुलगी दहा महिन्याची होतांच माझ्या सर्व सुखाचा शेवट झाला. व मी पक्की दुर्दैवी बनले. आमचे उभयतांचे वयाला अंतर ४१५ वर्षांचे होते. आणि तितक्यांत विद्या होऊन पैसे ते काय मिळणार ? तरी विवेचे नावाने १।२५ रु० खर्च होऊन अभ्यास सुरू असला ह्मणजे सर्वांना उमेद व कौतुक असते; तशी आमची स्थिति नव्हती. त्यांनी आपल्या हातून अभ्यास होत नाहीं ह्मणून विद्याभ्यास सोडून वॉच नीट करण्याचा धंदा चालविला होता. त्यांत २५/३० रुपये मिळत, परंतु तेही घरांत येत नसत. हे एक कारण, व अभ्यास सोडला हे दुसरे या दोन्ही कारणासाठी घरांतील सर्वांचा आमच्यावर राग असे. व माझ्यापुढे त्यांना सर्व बोलत, ते मला फार वाईट वाटे; परंतु उपयोग काय ? मी फार लहान असल्यामुळे