पान:विधवा दुःख निवेदन.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ १७ ] केल्या. आपल्या वडील मुलाला व्यापाराची माहिती देऊ दुसरी मुले त्यांनी इंग्रजी शाळेत घातली. व तीही पुढे विद्वान होऊन कामें करूं लागली. एक मुलगा उमरावतीस होता, बाकीचे जवळच आजूबाजूस होते. त्यांच्या कुटुंबांत विभक्तपणा मुळी नव्हता. आमचे मधल्या चुलत्याचीही विद्या तितकीच होती व थोडी शेतीभाती, व्यापार, आणि मोठा लांकडांचा कारखाना त्याच गावांत असल्यामुळे ते उभयतां एकत्र होते. आणि आमचे वडिलांचे आजारामुळे आमचीही मंडळी तेथे होती. आमच्या दुसऱ्या मातोश्रीला ४।२ मुले झाली, परंतु एकही राहिले नाही. नंतर वडिलांचे दुखणे अधिक होऊन त्यांतच त्यांचा अंत झाला. त्यावेळी आमची मातोश्री सहा महिन्याची गरोदर होती. तो मुलगा वांचला व तो आह्मां सर्वांना प्रिय वाटतो आणि मातोश्री पती मागे आपल्या सावत्र मुलांवर अतिशय प्रेम करून माझे भाऊही तिला मान देत असत. माझा वडील भाऊ त्या खेड्यांतील वकिली करून मळे दळ्यांच्या उद्योगांत असे. आणि दुसरा इंजिनियर आणि एक वकील आहे. व धाकटा शिकतो आहे. आमचे धाकटे चुलते स्वच्छंदी होते असे मागे सांगितलेच आहे; परंतु माझे वडील वारल्यानंतर त्यांनी मनावर घेऊन विद्यार्थी मुलांचे हाल न करितां घर बांधून आपल्या बायकोला आणून आपली चैन मागें सारून माझ्या भावाचे कुटुंबास जवळ ठेउनघेऊन संसारसुख घेऊ -