पान:विधवा दुःख निवेदन.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[१६] फारशी जरूर नव्हती; त्यांनी आमचे वडिलांचे आग्रहास्तव पाठविलें होते इतकेच कायतें. त्यांची शेतीभाती बरीच पसरल्यामुळे त्या कामांत मुलांना माहिती दिली पाहिजे ह्मणून व पुढे आपल्या हातून उत्तरोत्तर होणार नाही झणून दोन्ही कारणांनी शाळा सोडविली; आणि त्यांची तरी विद्या कोठे फार होती ? मराठी चार पांच बुकांपर्यंत शिकून तेवढ्यावरच त्या खेड्यांतील त्यांनी मामलत दहा वर्षे केली. पुढे व्यापार करूं लागले. आणि त्यांतच त्यानी बरीच इस्टेट केली. व आपल्या वडील मुलाला सर्व माहिती देऊन आपण देव उपासना करूं लागले; ते स्वभावाने फार दयाळू होते. सर्व दानांत अन्न दानाचे फळ विशेष आहे असे समजून ते नेहमी अन्नदान करीत असत. व घरांत पंक्तीला किती जरी मंडळी आली तरी ते अगदी गडबडत नव्हते. आपल्या मुलापासून तो नोकरापर्यंत सारखा जिन्नस वाढीत असत. सन १८७६ त जो दुष्काळ पडला होता, त्यांत त्यांनी दुष्काळपीडित गरीब लोकांनां आमटी भाकर व आंबील असी सतत चालविली होती; त्यांची ब्राह्मणांवर फार भक्ति असून ते नेहमी ब्राह्मणभोजने घालीत. त्यांनी तीर्थयात्रा, देवधर्म स्वाहाकारादि यज्ञ करून पुष्कळ पैसा खर्च केला. त्यांना पांच मुलगे व तितक्याच मुली होत्या. त्यानी आपल्या मुली थोरां-मोठ्यांच्या घरी दिल्या नव्हत्या; मात्र नामांकित व कुलीन घरे पाहून त्यानी मोठ्यांच्या मुली