पान:विधवा दुःख निवेदन.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[१५] ते, नंतर मी त्याच्याहून अधिक घालीन अशी मनाला फार उमेद येई. जावांवर केव्हाही दुष्टपणा केला नाही. गावांत जरी माझें माहेर होते तरी सासरी मी आनंदाने असे; मला पाळलेल्या चुलतीला मी आई या नावाने हांका मारी व माहेरपणाला तिजकडे जात असे. मला बापाचा लळा नव्हता; मलाच काय पण माझ्या भावालासुद्धा नव्हता. सुटी कधी येईल व आह्मी दादांचे जवळ कधीं जाऊं ही वाट पहात होतो. मला न्हाण वगैरे आल्यावर पुन्हा खर्च करण्याची पाळी आमचे वडिलांवर आली. खर्चाचे कामांत ते जरा मागे होते ह्मणून सांगितलेच आहे. त्याप्रमाणे गर्भदानांचा खर्च कसा बसा आटपून घेतला. नंतर काही कामाचे बाबतीत त्यांना पांच सहाशे रुपये खर्च पडला. त्यामुळे अथवा कशामुळे ह्मणा! त्यांचे डोके फिरून भ्रमरवाय झाला व ते अतोनात खर्च करूं लागले. तेव्हां कधीच नाही आणि आता इतका उदारपणा कुठून आला ह्मणून वडिल चुलते ह्मणजे दादा याणी शोध केला. तेव्हां त्यांना चलबिचल दिसून आली. तेव्हां त्यांनी मंडळीसहीत वडिलांना घेऊन जाऊन पुष्कळ उपाय केले; पण गूण न येतां उत्तरोत्तर त्यांचे दुखणे वृद्धिंगत झाले, त्यामुळे येथील थोडी मंडळी आपले गांवीं गेली. माझा वडील भाऊ व मातोश्री त्यांचे सुश्रुषेकरितां नेली आणि आपले मुलगे जे बरोबर नेले त्याचे कारण इतकेंच की, त्यांना इंग्रजी विद्येची