पान:विधवा दुःख निवेदन.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[१४] लागली, व सासूबाईंचे दुःख मागें केलें; नंतर आमचे भाऊजी वयाने लहान व होतकरू कामगार असल्यामुळे थोरांमोव्यांच्या मुली सांगून येऊ लागल्या, मग पुन्हां सासूबाईनां सुनमूख तयार करण्याची वेळ आली व घरांत फारसें नसल्यामुळे माझ्या दागिन्यावर पाळी आली. आधी बिजवराची बायको, हुंडा देऊन आली व त्यांत सासूबाईच्या माहेराहून ठरलेली मग काय विचारता, सासूबाईनी हौसेनें सुनमूख तयार केले. व माझ्या अंगावरचे सर्व दागिने घेऊन अवश्य लागणारे दोन जिन्नस ठेविले. ते कोणते ह्मणाल तर नथ आणि मंगळसूत्र. असो. याप्रमाणे आह्मांला नवीन जाऊ आली. पुढे मधली जाऊ वाली आणि दोन नवऱ्या घरांत विजवराच्या; मग आमीतर जुन्या पैकी झालों; असे माझ्या मनांत येऊन माझी सर्व हौस जागच्या जागी रहात असे; लहान मुलींना असे वाटते की, जगांत भूषण ह्मणजे उत्तम वस्त्र व पुष्कळ दागिने. परंतु खरे दागिने ह्मणजे निर्लोभ, भूतदया, मृदुभाषण, कलाकौशल्य; हे दागिने ज्याचे अंगांत आहेत तो मनुष्य एकाच देशांत काय तर सर्व देशांत भूषित होतो. परंतु आमच्या लहान वयाच्यावेळी स्त्रिसमुदायांत विद्यादेवीचा प्रवेश फारसा नसल्यामुळे आमाला इतकें ज्ञान कोठून असणार ? मात्र येवढे वाटे की लोकांचे दागिने अंगावर घालून मिरविणे यांत भूषण नाही. जाऊंदे आपले दोन दिवस आहेत