पान:विधवा दुःख निवेदन.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शिकविली ती उभयतां परतंत्र. आणि ही आली नशिबाची घरांत. बरोबरच आहे कारण आमचे साधू तुकारामबुवा यांनी एके ठिकाणी झटले आहे: अभंग. माय बापे केली आस । झाला बायकोचा दास ॥ तुकाराम. _ असे असून ज्या बाईनें इतके कष्ट केले त्या सासूची इतकी योग्यता मग आमचे सारखी जर घरांत असेल तर तिला कशारीतीने वागवितील व तिजवर ममता किती करतील हे पाहणे वाचकांवर सोपविते. परंतु माझ्या ह्या बोलण्याचा आमच्या बंधूना अथवा भगिनीना राग येईल, तरी विचार केला ह्मणजे राग येण्याची जरूर नाही. कारण जो मुलगा तो बाप होतो, आणि जी सून ती सासू होते. याचा अनुभव सर्वांना आहे. तर रागावू नका विचार करा आणि जर एखादा अवगूण असेल तर सोडून सुधारणा करा. आणि सीता, अनुसूया, अरुंधती प्रमाणे कीर्ति मिळवा. व आपले कुटुंबावर ममता ठेवा आणि मीपणा सोडून वागा ह्मणजे सहजच तुह्मांला सुशील व सद्गुणी ह्यणतील. असो. ह्याप्रमाणे आमची जाऊ मेल्यावर बखेडा होणे साहजीकच आहे. तरी आमची मधली जाऊ लहान होती खरी; परंतु ती तिच्याच संगतीने हुषार झाली होती आणि त्यामुळे थोडक्यांच दिवसांत पुढेसरून संसार संभाळून परदेशी जावेच्या मुलांवर ममता करूं