पान:विधवा दुःख निवेदन.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[१२] व३ वर्षांचे दोन मुलगे, व चवदा दिवसांची लहान एक मुलगी; अशा स्थितीत मग आमचे हाल काय विचारतां! तीन मुले परदेशी गळ्यांत; त्यांतच आमच्या सासुबाईची स्वतःची एक अडचण होती. दुसरे असे की, संसार सांभाळलेली सून बरोबरीची असल्यामुळे दुःख होणे साहजीकच आहे. कारण, ती धर्मनिष्ट व पापभिरू असे. त्या उभयतां सासूबाई मामाजीची सेवा मोठ्या भक्तीनें • करीत. भावोजी नेहमी फिरतीवर असल्यामुळे त्या सर्व दिवसभर देवधर्म व वडिलांची सेवाचाकरी यांत वेळ घालवीत. सासूबाईच्या तळव्याला तूप लावून पाय चुरल्या खेरीज कधीही आपल्या अंथरुणावर त्यांनी पाय दिला नाही. ह्मणून त्यांच्या दुःखाची दोन कारणे झाली. नाहीतर आमीं सुना ? सास्वेची पूजा ह्मणजे नवऱ्या कडून करवायची. आई तुला घरांत रहाणे असेल तर तिच्या विचाराने रहा. बायकोकडे पाहून हंसत, ही घरांत मालकीण, हिच्या विचाराखेरीज कांहीं कोणाला देतां कामानये; नाहीतर मला बिलकुल कोणाची जरूर नाही, मग काय विचारितां? बायको देखत लोकांसमोर आईस बोलतांच, तिचे तोंड सुरू झाले. माझ्या नशिबानेच सगळे मिळत आहे. पहिले घरांत काय होतें खेटर ? पोट भरण्याचीसुद्धां पंचाईत; आतां यथेच्छ जेऊन चेष्ठा व गप्पा आठवतात माताऱ्यांना हवेत कशाला कारभार ! झाला पहा चमत्कार कसा तो? जिने रज्याचे गज केले, दहाजणाचे आर्जव करून विद्या